Thursday, August 11, 2022

खुशखबर!! 9 नोव्हेंबरपर्यंत राज्य पोलीस दलात 29 हजार पदे भरणार!!- Police Bharti 2022 UpdateRK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

खुशखबर!! 9 नोव्हेंबरपर्यंत राज्य पोलीस दलात 29 हजार पदे भरणार!!- Police Bharti 2022 Update

Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022 : Maharashtra Police Department will be recruited 29 thousand posts until November 9. There are a total of 29 thousand 401 posts vacant including Officers, and employees in the Maharashtra Police Department. The Police Recruitment 2022 will be soon. For more details about Maharashtra Police Department Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

महाराष्ट्र पोलीस दलात कर्मचारीच नव्हे, तर अधिकाऱ्यांचीही वानवा आहे. आजघडीला अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिळून तब्बल २९ हजार ४०१ पदे रिक्त आहेत. राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव अनिल कुलकर्णी यांनी ५ जुलै २०२२ राेजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रातून रिक्त जागांचे हे ‘वास्तव’ उघड झाले आहे. 

 पोलीस दलातील कामकाज सुधारावे, या अनुषंगाने काेपरगाव (जि. अहमदनगर) येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय भास्कर काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली हाेती. काेराेना संकटामुळे या याचिकेवरील सुनावणी दाेन वर्षे लांबली. आता २५ जुलै २०२२ राेजी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. एम. एस. कर्णिक यांनी त्यावर सुनावणी करताना पाेलीस दलातील रिक्त जागांबाबत ९ नाेव्हेंबरला शासनाला शपथपत्र दाखल करण्यास सांगितले आहे. या तारखेपर्यंत किती जागा भरल्या व उर्वरित जागा केव्हा भरणार, याची माहिती शपथपत्राद्वारे मागण्यात आली आहे.

पोलीस भरती 2022 नवीन टेस्ट सिरीज 

पोलीस भरती लेखी परीक्षा नवीन सिल्याबस 

पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच 

Police Recruitment Vacancy 2022

Maharashtra Police Bharti 2022

या याचिकेच्या अनुषंगाने गृहविभागाने दाखल केलेल्या शपथपत्रात रिक्त पदांची स्थिती उघड केली. राज्य पाेलीस दलात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकूण ४३ वेगवेगळ्या पोस्ट आहेत. त्यासाठी एकूण दोन लाख १९ हजार ७७६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २९ हजार ४०१ पदे रिक्त आहेत. राज्यात एक लाख लाेकसंख्येमागे १९८ पाेलीस उपलब्ध हाेणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात १७४ पाेलीस उपलब्ध हाेत आहेत. वेळेत पदाेन्नती दिली जात नसल्यानेही रिक्त पदे वाढत आहेत. काेराेनापूर्वी पाेलीस दलात पाच टक्के पदे रिक्त हाेती. काेराेनानंतर ही टक्केवारी १३ वर पाेहाेचली आहे.

काय आहेत याचिकेतील मुद्दे?

  • वाहने अद्ययावत द्या
  • यंत्रणा सक्षम करा
  • तपासासाठी स्वतंत्र पाेलीस यंत्रणा असावी
  • सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा तैनात करावी
  • पाेलीस ठाण्यात सीसीटीव्ही असावे
  • शस्त्रे अद्ययावत असावीत
  • पाेलिसांकडे इलेक्ट्रिक गन (केवळ शाॅक देऊन बेशुद्ध करणारी बुलेट) असावी
  • पाेलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी विविध याेजना असाव्यात
  • आदी मागण्यांकडे या याचिकेतून लक्ष वेधले आहे

 

 

 

No comments:

Post a Comment

Thanks to Contact in RK COMPUTER RANGI

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...