Thursday, February 24, 2022

TATA ग्रुपचा मेगा प्लान!! 3 हजार जणांना मिळणार रोजगार

 

TATA ग्रुपचा मेगा प्लान!! 3 हजार जणांना मिळणार रोजगार

TATA Group Mega Bharti

Tata Technologies Jobs 2022-2023

TATA Group Mega Bharti  : Many private sector companies, including the government, will now start large-scale recruitment process. This includes the Tata Group, which will employ about 3,000 people in one company. Further details are as follows:-

सरकारीसह खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्या आता मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू करणार आहेत. यामध्ये टाटा ग्रुपचा समावेश असून, एका कंपनीत सुमारे ३ हजार जणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

टाटा ग्रुपच्या Tata Technologies ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ३ हजारांहून अधिक नवोदितांना कामावर घेण्याची योजना आखत आहे. टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली. जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन विकास डिजिटल सेवा कंपनीने विस्तारित भरती कार्यक्रमाचा भाग म्हणून आगामी १२ महिन्यांच्या कालावधीत ३ हजारांहून अधिक नवोदितांची भरती करण्याची योजना जाहीर केली. याअंतर्गत, देशातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू यांसारख्या राज्यांसह जगभरातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये कर्मचारी वाढवण्याची योजना आखली आहे.

कंपनीची क्षमता अनेकपटींनी वाढू शकेल 

टाटा टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन हॅरिस यांनी सांगितले की,

  • आम्ही संधी गमावत नाही, हे नमूद करू इच्छितो. यासाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे.
  • या पार्श्वभूमीवर आम्ही आमची गुंतवणूक क्षमताही वाढवत आहोत.
  • यामुळे कंपनीची क्षमता अनेकपटींनी वाढू शकेल, असे ते म्हणाले.
  • याशिवाय, चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत आम्ही १५०० जणांची भरती केली, यावरून कंपनी या क्षेत्रात किती यशस्वी ठरली आहे, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता.
  • या आर्थिक वर्षात आम्ही कमीत कमी १ हजार ते जास्तीत जास्त ३ हजारांहून अधिक लोकांची नियुक्ती करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Meanwhile, Tata Technologies is currently growing rapidly due to its investments in Autonomous, Connected, Electrification and Shared Mobility and Digital. The company is also striving to meet the needs of new customers. Tata Technologies posted an operating profit of Rs 1,034 crore and a profit of Rs 201.2 crore in the third quarter. This is the best performance of this company.


TATA Group Mega Bharti 2022 Details 

TATA Group Mega Bharti  : It is said that this semiconductor assembly project of Tata Group will be operational by the year 2022 and it will create about 4,000 jobs. Meanwhile, a few months ago, the TATA Group had announced plans to enter the semiconductor sector. Further details are as follows:-

TATA Group Mega Recruitment 2022 

TATA ग्रुपचा मेगा प्लान! ‘या’ ३ राज्यांत सेमीकंडक्टर प्रकल्प उभारणार; ४ हजार रोजगार मिळणार. काही महिन्यांपूर्वीच TATA ग्रुपने सेमीकंडक्टर क्षेत्रात उतरण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ऑटोमोबाइल क्षेत्राला सेमीकंडक्टर चीपच्या तुटवड्याचा गंभीर सामना करावा लागत आहे. यामुळे वाहनांच्या निर्मितीवर मोठा परिणाम झाला असून, मागणी असूनही वाहने उत्पादित करून वितरीत करण्यात अडचणी निर्माण होत आहे. कोरोना संकट काळापासून सेमीकंडक्टर चीपचा तुटवडा गंभीर विषय बनलेला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी CONTACT TO : RK COMPUTER RANGI 9767557246 Email : roshankannake96@gmail.com 

कोरोना संकटापासून हळूहळू जागतिक अर्थव्यवस्था सावरताना दिसत आहे. अनेक क्षेत्रे पुन्हा नव्या जोमाने सुरू झाले आहेत. भारतातील फेस्टिव्ह सीझनमध्ये वाहन खरेदी जोमात असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, सेमीकंडक्टरच्या मोठ्या कमतरतेमुळे ऑटोमोबाइल कंपन्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. अशातच आता TATA ग्रुपने मोठी योजना आखली असून, देशातील तीन राज्यांमध्ये सेमीकंडक्टर असेंबली प्रकल्प उभारण्यावर मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, टाटा समूह यासाठी २२५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

TATA ग्रुपची आउटसोर्स्ड सेमीकडंक्टर असेंबली प्रकल्पासाठी तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांशी चर्चा सुरू आहे. तसेच या राज्यांमध्ये जमीन अधिग्रहणाबाबतही बोलणी सुरू असून, लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात आहे. रॉयटर्सनुसार, टाटा ग्रुप सेमीकंडक्टर असेंबली प्रकल्पाबाबत पुढील महिन्यात सर्व गोष्टी अंतिम करू शकतो. TATA ग्रुप सॉफ्टवेअरच्या बाबतीत अद्ययावत, अग्रेसर आणि मजबूत असून, आता हार्डवेअरच्या बाबतीतही टाटा समूहाला मजबूत व्हायचे आहे, असे सांगितले जात आहे. TATA ग्रुप यासाठी इंटेल, एएमडी आणि एसटी मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स यांच्याशी करार करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सन २०२२ पर्यंत टाटा ग्रुपचा हा सेमीकंडक्टर असेंबली प्रकल्प कार्यान्वित होऊ शकेल आणि यामुळे सुमारे ४ हजारांवर रोजगार निर्मिती होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच TATA ग्रुपने सेमीकंडक्टर क्षेत्रात उतरण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. आताच्या घडीला सेमीकंडक्टर क्षेत्रात चीनची मक्तेदारी आहे. यासंदर्भात टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी याबाबत माहिती दिली होती.

भारताच्या ऑटोमोबाइल क्षेत्रात सेमीकंडक्टरची वाढती मागणी आणि कोरोना संकटामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेली चणचण या पार्श्वभूमीवर TATA ग्रुपने पाऊल उचलले असून, आता सेमीकंडक्टर तयार करण्याच्या क्षेत्रात उतरणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची जागतिक बाजारपेठ सुमारे १ ट्रिलियन डॉलर आहे. TATA ग्रुपने या मार्केटमध्ये हिस्सा मिळण्याच्या संधींचे आधीच नवीन व्यवसाय उभारले आहेत. सेमीकंडक्टर निर्मितीसाठी प्रचंड गुंतवणुकीची आवश्यकता असते. सध्या जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे आणि भारतात कोणतीही कंपनी सेमीकंडक्टर तयार करत नाही. यात कोरोना संकटाची भर आणि राजकीय कारणांमुळे कंपन्या आता इतर देशावर अवलंबून आहेत.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...