त्वरित नोंदणी करा 31 march last date MHT CET 2022 प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु;
MHT CET Exam 2022 Application
MHT CET Exam : Application process for Maharashtra Common Entrance Exam has started. Candidates who want to sit for this exam can apply till March 31, 2022. Candidates can apply by going to the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (MHT CET Cell) विविध उच्च शिक्षणातील इंजिनीअरिं, फार्मसी, कृषी इत्यादी विषयातील अंडर-ग्रॅज्युएट (UG) आणि पोस्ट-ग्रॅज्युएट (PG) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येते. महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा 2022 (MHT CET 2022) साठी नोंदणीची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ३१ मार्च ही एमएचटी सीईटी २०२२ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
How to Register MHT CET 2022
- महाराष्ट्र सीईटी २०२२ साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जा.
- एमएचटी सीईटी २०२२ ऑनलाइन नोंदणी लिंकवर क्लिक करा.
- नवीन पेजवर ‘New Registration’ वर क्लिक करा.
- मागितलेले तपशील भरून नोंदणी करा आणि अर्ज सबमिट करा.
- महाराष्ट्र CET २०२२ नोंदणी करण्यासाठी उमेदवारांना ८०० रुपये शुल्क भरा. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्कात सवलत दिली जाईल.
- शुल्क भरल्यानंतर उमेदवारांनी सबमिट केलेल्या अर्जाची सॉफ्ट कॉपी सेव्ह करा.
MHT CET २०२२ साठी महत्वाचे निर्देश
- उमेदवार बारावी (बारावी/समकक्ष परीक्षा) उत्तीर्ण किंवा परीक्षा देत असावा.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडे संबंधित वैध प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे.
- MHT CET २०२२ च्या नोंदणीसाठी उमेदवारांनी त्यांचा सक्रिय ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरावा.
- सीईटी आणि केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत उमेदवाराकडे त्याचा/तिचा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक सक्रिय असणे गरजेचे आहे.
- उमेदवाराने अंतिम सबमिशन आणि पेमेंट करण्यापूर्वी अर्ज पडताळून पाहणे आवश्यक आहे.
- सबमिट केलेला अर्ज आणि भरलेले शुल्क परत केले जाणार नाही. त्यामुळे पैसे भरण्यापूर्वी तपशील पडताळून पाहा.
- प्रमाणपत्रासाठी फोटो, सही यांची चांगली क्वालिटी अपलोड करा.
अधिकृत वेबसाईट – cetcell.mahacet.org
MHT CET 2022 Registration
MHT CET Exam : Candidates are required to submit an online registration form for MHT-CET-2022 Entrance Examination as per the mentioned schedule. The start date for online registration application is 10 February 2022 and note that the last date to apply is 31 March 2022.
शैक्षणिक वर्ष २०२२-23 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी – २०२२ प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज नमूद वेळापत्रकानुसार सादर करावयाचे आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.