Tuesday, December 13, 2022

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवकांना संधी; ऑनलाईन अर्ज करा | SPI Aurangabad Admission Form 2023 : RK COMPUTER RANGI 9767557246, 7821026932

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवकांना संधी; ऑनलाईन अर्ज करा | SPI Aurangabad Admission Form 2023


SPI Aurangabad Admission Form 2023

SPI Aurangabad Admission Form 2023: Good news for Maharashtrian People. Services Pre-service Education Institute is invited online applications for interested and eligible candidates. Eligible candidates can apply online before the 12th of March 2023. Further details are as follows:-

rkcomputerrangi                                                                 पूर्ण जाहिरात इथे पहा 

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, (एस.पी.आय.) औरंगाबाद :- संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांना जास्तीत जास्त संख्येने जावे, ह्यासाठी औरंगाबाद येथे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची (SPI) स्थापना महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. संस्थेच्या पुढील, ४७ व्या तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 

ऑंनलाईन अर्ज करण्यासाठी संपर्क करा.

RK COMPUTER RANGI 9767557246, 7821026932

Eligibility – SPI Aurangabad Exam 2023 

पात्रता :

  • अ) अविवाहित (मुलगा).
  • ब) महाराष्ट्राचा अधिवासी (Domicile).
  • क) जन्म तारीख ०१ जानेवारी २००७ ते ३१ डिसेंबर २००८ च्या दरम्यान.
  • ड) मार्च / एप्रिल / मे २०२३ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला बसणारा.
  • इ) जून-२०२३ मध्ये इयत्ता ११वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा.

Physical Criteria For SPI Admission 2023

शारीरिक पात्रता :

सैन्यदलात अधिकारी बनन्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावा. UPSC ने NDA आणि INA साठी दिलेल्या शारीरिक सर्व निकषांस पात्र असावा. हे निकष UPSC तथा संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. काही प्रमुख निकष उंची – १५७ सें. मी. वजन ४३ कि.ग्रा. छाती न फुगवता ७४ सें.मी. फुगवून- ७९ सें.मी., रातांधळा किंवा रंगांधळेपणा नसावा. NDA/ INA प्रवेशासाठी UPSC च्या अधिसूचनेनुसार डोळ्यांची क्षमता असावी (eye power ).

Written Examination & Interviews 


लेखी परीक्षा आणि मुलाखत :-

पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून ०९ एप्रिल २०२३ रोजी विविध केंद्रावर घेतली जाईल. परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत १५० माकांचे बहुपर्यायी Multiple Choice Questions, ७५ गणिताचे आणि ७५ सामान्यज्ञान General Ability Test (GAT) असतील. लेखी परीक्षा साधारणतः इयत्ता ८वी ते १० वीच्या टेस्ट बोर्ड व सी.बी.एस.ई. च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. प्रत्येक योग्य उत्तराला (१) गुण मिळेल. यशस्वी परीक्षार्थीना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.


How to Apply – SPI Aurangabad 

ऑनलाईन अर्ज www.spiaurangabad.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. परीक्षा शुल्क रुपये ४५०/- (परत न करता येण्याजोगे) ऑनलाइन फक्त क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंग इत्यादींद्वारे भरावे. डिमांड ड्राफ्ट किंवा चलानद्वारे भरलेले परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्ती नुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर होइल, तसेच प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार नाही.

SPI (Services Preparatory Institute) Aurangabad Exam 2023 – Important Dates 

  • प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आणि वेळ १२ मार्च २०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • हॉल तिकीट : दिनांक ३० मार्च २०२३ सकाळी १०.०० वा. नंतर संस्थेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येतील.

परीक्षा संबंधित सूचनांसाठी वेळोवेळी www.spiaurangabad.com हे संकेत स्थळ वेळोवेळी तपासावे. इतर कोठेही ह्या बाबत सूचना दिल्या जाणार नाही.


JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...