Friday, July 8, 2022

UGC NET December 2021 and June 2022 Exam Date

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)


UGC NET December 2021 and June 2022 Exam Date

UGC Net Exam Details: National Testing Agency (NTA) has announced the UGC NET December 2021 and June 2022 Exam Dates. A total of 35 subjects have been selected for the exams to be held on July 9, 11 and 12, five on July 9, five on July 11 and four on July 12. For more details about exam visit https://ugcnet.nta.nic.in & www.nta.ac.in website. Further dteails are as follows:-


  • नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) सहायक प्राध्यापकपदाच्या पात्रतेसाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) ९, ११ व १२ जुलै व १२, १३, १४ ऑगस्ट या तारखांना होणार आहे.
  • डिसेंबर २०२१मध्ये नेट परीक्षा होऊ शकली नव्हती.
  • त्यामुळे डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ या दोन्ही सत्रांची एकच सामायिक परीक्षा घेण्याचा निर्णय ‘एनटीए’कडून घेण्यात आला आहे.
  • या परीक्षेचे विषयानुसार सविस्तर वेळापत्रक ‘एनटीए’च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
  • कम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) या पद्धतीने ही परीक्षा पार पडणार आहे.

९, ११ व १२ जुलैला होणाऱ्या परीक्षेसाठी एकूण ३५ विषयांची निवड करण्यात आली असून, नऊ जुलैला २६, ११ जुलैला पाच, तर १२ जुलैला चार विषयांची परीक्षा होणार आहे. यात सर्व प्रकारच्या भाषा, राज्यशास्त्र, संरक्षण शास्त्र, होम सायन्स, मानवी अधिकार अशा विषयांचा समावेश आहे. १२, १३ व १४ ऑगस्टला होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे ‘एनटीए’कडून स्पष्ट करण्यात आले आहे. जुलै महिन्यात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना ‘एनटीए’च्या वेबसाइटद्वारे मिळणार असून, त्या संदर्भातील माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

  • नेट परीक्षेसंदर्भातील इतर अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ‘एनटीए’च्या वेबसाइटवर सातत्याने संपर्क करत राहावा, परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती वेळोवेळी वेबसाइटद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, असे ‘एनटीए’कडून सांगण्यात आले आहे.
  • https://ugcnet.nta.nic.in व www.nta.ac.in या लिंकद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

Important About Exam 

  • १. ९, ११ व १२ जुलैला होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर.
  • २. १२ ते १४ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार.
  • ३. जुलैमधील परीक्षांसाठीच्या प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांनी ‘एनटीए’च्या वेबसाइटशी संपर्क साधावा.
  • ४. डिसेंबर २०२१ व जून २०२२ची परीक्षा एकत्र होणार.

No comments:

Post a Comment

Thanks to Contact in RK COMPUTER RANGI

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...