वनविभागाची पदभरतीची जाहिरात १५ जानेवारी पर्यंत येणार! – MahaForest Bharti 2023
अपर प्रधान मुख्य वनरक्षक शोमिता बिश्वास यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षेत्रीय स्तरावर बहुतेक संवर्गाच्या बिंदुनामावल्या अद्याप मागासवर्गीय कक्षाकडून मंजूर करून घेण्यात आलेल्या नाहीत.
तसेच वनविभागातील भरती प्रक्रियेसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेक अर्थात टीसीएससोबत करार करण्यास शासनाने मान्यता दिली असून, कराराची कार्यवाही सध्या सुरू आहे. सध्याची परिस्थिती विचारात घेता 20 डिसेंबरला जाहिरात देणे शक्य नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेकरिता सुधारित कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसारच आता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
असा आहे पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम :-
- सर्व संवर्गाची बिंदुनामावली मंजूर करून घेणे – 26 डिसेंबर
- भरती प्रक्रियेसाठी कंपनीशी करार करणे – 31 डिसेंबर
- जाहिरात प्रसिध्द करणे – 15 जानेवारी
- अर्ज स्वीकारणे – 31 जानेवारी
- ऑनलाइन परीक्षा घेणे – 1 ते 20 फेब—ुवारी
- ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर करणे – 25 फेब—ुवारी
- आवश्यक पदांसाठी चाचणी – 5 ते 20 मार्च
- अंतिम निवड सूची जाहीर करणे – 15 एप्रिलपर्यंत
- नियुक्ती आदेश निर्गमित करणे – 30 एप्रिलपर्यंत
Van Vibhag Bharti 2023
मंत्रालयात झालेल्या वन विभागाच्या बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी वन विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) डॉ. वाय. एल. पी. राव, अपर मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता, शोमिता विश्वास यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
- मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्य शासनाने या वर्षात ७५ हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्यात वन विभागातील रिक्त पदे प्राधान्याने भरली जावीत, यादृष्टीने वन विभागाने आवश्यक कार्यवाही गतीने करण्याची गरज आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या पदांच्या अनुषंगाने विभागाने तातडीने मागणी त्यांच्याकडे नोंदवून पदभरती प्रक्रियेची कार्यवाही सुरु करण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
- ज्या पदांची भरती टीसीएस या त्रयस्थ यंत्रणेमार्फत होणार आहे, ती कार्यवाही विभागाने तत्काळ सुरु करावी.
- पदभरतीच्या प्रक्रियेत वन विभाग कुठेही मागे राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
No comments:
Post a Comment
Thanks to Contact in RK COMPUTER RANGI