Thursday, May 19, 2022

महत्वाचा अपडेट- 12600 पदांची पोलीस भरती लवकरच! – Police Bharti 2022 : RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

महत्वाचा अपडेट- 12600 पदांची पोलीस भरती लवकरच! – Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022


मित्रांनो, आनंदाची बातमी म्हणजे आज १८ मे २०२२ रोजी पोलीस भरतीला सुरवात झाली आहे. आज गडचिरोली जिल्ह्यासाठी १३६ पदांची  नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे. या अनुषंगाने अन्य जिल्हांनच्या जाहिराती सुद्धा लवकरच प्रकाशित होणे अपेक्षित आहे.  या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर प्राप्त करण्यासाठी RK COMPUTER RANGI शी संपर्कात राहा. 9767557246, 7821026932
EMAIL : rkcomputerrangi@gmail.com
roshankannake96@gmail.com
jaysewa1996@gmail.com




कोरोना काळात अनेक पोलिसांनी जीव गमावला आहे. अनेकजण सेवानिवृत्त झाले. अनेकांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. तसेच अपघात किंवा आजारपणामुळे काहींचा मृत्यू झाला. अनेकांना पदोन्नती मिळाली तर काहीजण विविध कारणांवरून निलंबित तथा बडतर्फ झाले. त्यामुळे राज्याच्या पोलिस दलात सध्या १८ हजारांहून अधिक पोलिसांची पदे रिक्त झाली आहेत.

ग्रामीण पोलिसांची स्थिती 

  • एकूण पोलिस ठाणी- २५
  • अधिकारी-कर्मचारी- २६००
  • होमगार्ड- १८००

—-

शहर पोलिसांची स्थिती

  • एकूण पोलिस ठाणी- ७
  • अंदाजित अधिकारी-कर्मचारी – १५२४
  • होमगार्ड – ८०० ते ९००

अतिशय कमी मनुष्यबळात पोलिसांन अतिरिक्त काम करावे लागत आहे. वाढती लोकसंख्या, गुन्हेगारीचे प्रमाण, कामाचे बदलते स्वरूप व वालेला ताण लक्षात घेऊन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पोलिसांची भरती होईल, अशी शक्यता आहे. सद्यस्थिती पाहता आगामी काळात भरती करावीच लागणार आहे.

Click here to Shopping with RK computer Rangi

कोरोना संकटाचा मुकाबला करताना लोकांचे जीव वाचायला हवेत या हेतूने पोलिसांनी रात्रंदिवस रस्त्यांवर खडा पहारा दिला. त्यावेळी अनेक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. निर्बंध शिथिल झाल्यानंतर दोन वर्षांत साजरे न झालेल्या सण-उत्सवाला, जयंती-मिरवणुकीवेळी पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागली. दैनंदिन काम करतानाच पोलिसांनी सव्वादोन वर्षांत बहुतेकवेळा ना सुटी, ना रजा घेता केवळ ड्युटी करून त्यांची पॉवर दाखवून दिली. अनेकांना त्या काळात सुटी, रजा मिळत नाही.

  • देश मागील सव्वादोन वर्षांत कोरोना संकटाचा मुकाबला करत असतानाच जिल्ह्यात लागू केलेल्या लॉकडाउनची कडक अंमलबजावणी, संचारबंदीत बंदोबस्ताची भूमिका, गर्दी होणार नाही आणि गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची पुरेपूर दक्षता पोलिस बांधवांनी घेतली.
  • अतिवृष्टी, महापूर, कोरोनासह इतर संकटात लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या पोलिसांनी कुटुंबाची व स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोखपणे बजावले, त्यांच्या कार्याला सलाम.
  • कोरोनासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री व राज्यपालांचे दौरे, आरक्षणाच्या मुद्द्यांवरून होणारी आंदोलने, विविध मुद्द्यांवर निघालेले मोर्चे, उपोषणावेळीही पोलिसांनी बंदोबस्ताची ड्युटी सांभाळली.
  • पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.
  • वर्षातून चारवेळा मोठ्या वाऱ्या असतात. त्यावेळीही पोलिस बंदोबस्त देतात.
  • भीमा-कोरेगावलाही दरवर्षी पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागते.
  • शिवजयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव (दसरा)अशावेळीही मोठा बंदोबस्त लागतो.
  • एसटी महामंडळाचे आंदोलन आणि आता भोंग्यांवरून वातावरण पेटले असून त्यासाठीही पोलिसांनी बंदोबस्ताची ड्युटी चोख बजावली.
  • शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत आणि दैनंदिन कामकाज सांभाळत मागील सव्वादोन वर्षांत पोलिसांना त्यांच्या मनाप्रमाणे सुटी, रजा मिळालेली नाही.
  • तरीही, ते कोणत्याही तणावाशिवाय बंदोबस्ताची ड्युटी सांभाळत आहेत.

कोरोनाच्या संकटात पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे योगदान फार मोठे राहिले आहे. आता निर्बंध शिथिल झाल्यानंतरही त्यांना वारी, यात्रा, जयंती, सण-उत्सव, मिरवणुका, मोर्चे, मेळावे, व्हीआयपींचे दौरे अशावेळी कोणताही तणाव न बाळगता पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्ताची ड्युटी करतात. त्यासोबतच दैनंदिन कामही चोखपणे बजावतात.

No comments:

Post a Comment

Thanks to Contact in RK COMPUTER RANGI

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...