Wednesday, March 23, 2022

एमएएच-बी.एड.-एम.एड.-सीईटी २०२२ परीक्षेसाठी पुर्वापेक्षित अट

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) 7821026932 rkcomputerrangi@gmail.com

एमएएच-बी.एड.-एम.एड.-सीईटी २०२२ परीक्षेसाठी पुर्वापेक्षित अट


STARTED DATE : 19/03/2022


APLICATION END DATE : 07/04/2022


  1. उमेदवाराने शालेय विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे किंवा परीक्षेला बसणे (appear) आवश्यक आहे.

  2. माहितीपुस्तीकेत सुस्पष्ट सूचना दिल्या असूनही उमेदवाराने जर अपात्र असतांना अर्ज केला असेल तर त्यांनी भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही अथवा इतर कोणत्याही अभ्यासक्रमाच्या सीईटीमध्ये त्याला समायोजित केल्या जाणार नाही.

  3. संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए) / (एन.टी.(बी) / एन.टी.(सी) / एन.टी.(डी) /विशेष मागास वर्ग या उमेदवारांकडे अपेक्षित संवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवार उन्नत उत्पन्न गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत वैध आहे, असणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांनी पात्रता पदवी महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठातून उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

  4. दिव्यांग उमेदवाराजवळ दिव्यांगत्वाचे किमान ४० टक्के किंवा अधिक असे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

  5. शुल्क- महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी साधारण प्रवर्गाच्या उमेदवारासाठी.(ओ.एम.एस.) रु.१०००/-

  6. महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती /इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए)/(एन.टी.(बी)/एन.टी(सी)/एन.टी(डी)/ विशेष मागास वर्ग) रु. ८००/-

  7. उमेदवारांनी कृपया संगणक आधारित चाचणीचा ऑनलाईन नोंदणी अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी.

  8. ऑनलाईन भरलेला अर्ज काळजीपूर्वक तपासून नंतरच अर्जाचे शुल्क अदा करावे.

  9. एकदा ऑनलाईन शुल्क अदा केलेल्या अर्जात भरलेली माहिती उमेदवारांना दुरुस्त करता येणार नाही आणि ती माहिती उमेदवारांवर बंधनकारक राहील.

  10. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांचा स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत उमेदवाराने स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी बदलू नये.

  11. भरलेल्या आणि शेवटी सादर केलेल्या माहितीसाठी उमेदवार जबाबदार आहेत.

  12. कृपया आपला आप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि ओटीपी कोणालाही देऊ नका.

  13. कृपया छायाचित्र, स्वाक्षरी आणि ओळखपत्र चांगल्या प्रतीचे अपलोड करा.

  14. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी तसेच नवीन सूचनाकरिता https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत संकेतस्थळा ला भेट द्यावी.

  15. एका अर्ज फॉर्मसाठी उमेदवार फक्त एक मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी वापरू शकतो.

  16. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सूचना व माहिती पुस्तिका वाचली आहे असे समजण्यात येईल








No comments:

Post a Comment

Thanks to Contact in RK COMPUTER RANGI

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...